dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल

मलकापूर : ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका गावातील रहिवाशी असलेल्या व महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या 17 वर्षीय मुलीचा आरोपीने विनयभंग केला. पीडिता भाव देत नसल्याचे बघून नराधमाने कमरेच्या चामडी बेल्टने तिला बेदम मारहाण केली. तसेच तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची गंभीर घटना आज 7 जानेवारीच्या पहाटे समोर आली.

मलकापूर : ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका गावातील रहिवाशी असलेल्या व महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या 17 वर्षीय मुलीचा आरोपीने विनयभंग केला. पीडिता भाव देत नसल्याचे बघून नराधमाने कमरेच्या चामडी बेल्टने तिला बेदम मारहाण केली. तसेच तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची गंभीर घटना आज 7 जानेवारीच्या पहाटे समोर आली. मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका गावातील रहिवाशी असलेला आरोपी करण दादाराव वानखेडे (19) याने सुरुवातीला पीडितेचा पाठलाग सुरु केला. तिच्यासोबत जवळीक साधली. एवढ्यावरच न थांबता पीडिता भाव देत नाही म्हणून आरोपीने कमरेच्या बेल्टने पीडितेला बेदम मारहाण केली. तसेच तिला वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. सोबतच पीडितेला व तिच्या कुटुंबियांना कॉल करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या घटनेनंतर पीडितेने व तिच्या कुटुंबीयांनी मोठी हिंमत करून मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन गाठले. घडलेली हकीकत पोलिसांना सांगितली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top