अकोला : काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना मंगळवार ६ जानेवारी रोजी अकोट तालुक्यातील मोहाळा येथे घडली होती. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून आरोपीस अटक करण्यास पोलीसांना यश आले आहे.

अकोला : काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना मंगळवार ६ जानेवारी रोजी अकोट तालुक्यातील मोहाळा येथे घडली होती. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाल्याची माहिती आहे. या प्रकरणातील आरोपीस अटक करण्यास पोलीसांना यश आले आहे.
जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या त्यांच्या मोहाळा गावात झाला जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती आहे. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. गंभीर जखमी असलेल्या हिदायत पटेल यांना अकोटमधील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, पुढील उपचारासाठी अकोल्याला रेफर केले आहे. हिदायत पटेल २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार होते. हिदायत पटेल सध्या काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. गावातील राजकीय संघर्षातून हा चाकू हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
