dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

ट्रॅक्टर पलटी होऊन अल्पवयीन ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू

डोणगाव :  येथून जवळच असलेल्या आरेगाव माळ परिसरामध्ये 2 जानेवारीच्या रात्री 1 वाजता दरम्यान ट्रॅक्टर भरधाव वेगाने चालवणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन  ट्रॅक्टर चालक मुलाचा ट्रॅक्टर पलटी होऊन मृत्यू झाला. या प्रकरणी 3 जानेवारी रोजी ट्रॅक्टर मालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  शुक्रवार 2 जानेवारीच्या रात्री एम एच 28 टी 8709 या ट्रॅक्टरवर  ऋषिकेश किरण भुतेकर वय 17 वर्ष 7 महिने हा आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर भरधाव वेगाने  चालवत असताना त्याचे ट्रॅक्टर रोडखाली नालीत जावून पलटी झाले. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी संभाजीनगर येथे नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी दत्ता पुंजाजी भुतेकर वय 42 वर्ष यांनी डोणगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून  पवन अरुण काळे रा. डोणगाव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     सूत्राच्या माहितीनुसार आरेगाव रस्त्यावरील एका बांधकामासाठी  मुरूम आरेगाव येथील एका ठिकाणावरून येत होता. रात्री अकरा वाजेपासून मुरूम आणणे चालू होते. यामध्ये काही वाहन चालकांनी मुरूम टाकण्याच्या ठिकाणी कोण लवकर पोहोचतो? अशी शर्यत लावण्यात आली होती. यामध्येच ही घटना घडल्याची चर्चा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top