जालना : ऊसतोड कामगारांना ऊसतोडीसाठी नेहमीच स्थलांतरित व्हावे लागते. यामुळे त्यांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित रहावे लागते. अशा हंगामी स्थलांतर करणाऱ्या उसतोड कामगारांच्या मानसिक, सामाजिक व कौटुंबिक समस्या लक्षात घेऊन त्यांना आरोग्य, पोषण व शिक्षणाबाबत मार्गदर्शन व आधार मिळावा, या उद्देशाने समूहउपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने राबविण्यात आला.

या समूपदेशन कार्यक्रमात उसतोड कामगारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कामाच्या ताणतणावामुळे निर्माण होणाऱ्या मानसिक अडचणी, कुटुंबापासून दूर राहण्याची वेदना, आर्थिक समस्या, व्यसनाधीनता, आरोग्य व पोषण शिक्षणासंबंधी अडचणी तसेच मुलांच्या शिक्षणाबाबतच्या चिंता या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
तज्ज्ञ समुपदेशकांनी संवादात्मक पद्धतीने कामगारांचे प्रश्न ऐकून घेत सकारात्मक विचारसरणी, तणाव व्यवस्थापन, कौटुंबिक संवाद, व्यसनमुक्ती व आरोग्याची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. समूहचर्चेमुळे कामगारांना एकमेकांचे अनुभव ऐकण्याची व मनमोकळेपणाने संवाद साधण्याची संधी मिळाली.
या कार्यक्रमाचा महत्त्वपूर्ण परिणाम म्हणून १५१ मुले पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सहभागी झाली असून, हे यश सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने उल्लेखनीय ठरले आहे. समुपदेशनामुळे कामगारांमध्ये आत्मविश्वास वाढला असून मानसिक आरोग्य जपण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम नियमितपणे राबवावेत, अशी अपेक्षा सहभागी कामगारांनी व्यक्त केली.
या उपक्रमासाठी अप्पासाहेब उगले, प्रकल्प संचालक, भाऊसाहेब गुजाळ, जिल्हा संपर्क अधिकारी, अश्वजित जाधव, प्रकल्प व्यवस्थापक यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा समन्वयक एकनाथ राऊत, राजेश वाघमारे, सुरेखा वाघमारे, दुर्गा नाडे, आकाश चैगुलै, महादेव खरात, योगेश आढे यांची विशेष उपस्थिती व सहकार्य लाभले.