मलकापुरात महसूल आणि पोलीस विभागाचे धडक कारवाई, अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या टिप्परसह दिड कोटीचा ऐवज जप्त

मलकापूर  : तालुक्यातील नरवेल मंदिर शिवाराजवळ अवैध वाहतुक करणारे टिप्पर अडवून त्या प्रती टिप्परमधील दोन ब्रास वाळू व टिप्पर असा एकूण १ कोटी ६२ लाख रुपयाचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई मलकापूर पोलिसांनी २४ डिसेंबर रोजी रात्री केली असून २५ डिसेंबर रोजी तब्बल ८ जणांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. 

मलकापूर  : तालुक्यातील नरवेल मंदिर शिवाराजवळ अवैध वाहतुक करणारे टिप्पर अडवून त्या प्रती टिप्परमधील दोन ब्रास वाळू व टिप्पर असा एकूण १ कोटी ६२ लाख रुपयाचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई मलकापूर पोलिसांनी २४ डिसेंबर रोजी रात्री केली असून २५ डिसेंबर रोजी तब्बल ८ जणांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. मलकापूर शहर पोस्टेच्या पोलिसांनी नरवेल कोटेश्वर मंदिर परिसराजवळ वाळू वाहतुक करणाऱ्या टिप्परला हात देवून अडविले. सदर टिप्परमध्ये एकूण १६ ब्रास वाळू असून टिप्परची संख्या ही ८ आहे. प्रती टिप्पर व त्यामधील वाळू असा १ कोटी ६२ लाख रुपयाचा ऐवज जप्त केला आहे. याबाबत वाळू वाहतुक करणारे नदीम खान अजीम खान (पारपेट मलकापूर), सागर शालिक्राम रायपुरे (भानगुरा), शुभम माणिक इंगळे (धरणगाव), गोपाल हिरालाल बोरे (राहिदास नगर मलकापूर), आशिष गंजीधर खोटाळे (भोरटेक), आकाश प्रकाश इंगळे (निंबारी), अतुल सुरेश भालेराव (बुर्टी), सुरज विजय झनके (धरणगाव) यांच्याविरुध्द विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून सदर वाळू ही व टिप्पर जप्त केले आहेत. या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतुक करणाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »