डोणगाव : जवळच असलेल्या विठ्ठलवाडी शिवारात किरकोळ कारणावरून एका ७७ वर्षीय व्रृध्दाचा खून करण्यात आला. घटनेची माहिती पोलीसांनी मिळताच पोलीसांनी घटनास्थळी पोहचून पाहणी केली व आरोपीचा शोध घेणे सुरू केले दरम्या अवघ्या तासाभरातच आरोपीला पोलीसांनी अटक केली.

डोणगाव : जवळच असलेल्या विठ्ठलवाडी शिवारात किरकोळ कारणावरून एका ७७ वर्षीय व्रृध्दाचा खून करण्यात आला. घटनेची माहिती पोलीसांनी मिळताच पोलीसांनी घटनास्थळी पोहचून पाहणी केली व आरोपीचा शोध घेणे सुरू केले दरम्या अवघ्या तासाभरातच आरोपीला पोलीसांनी अटक केली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विठ्ठलवाडी वाडी शिवारात मखराम चतरु राठोड रा. विठ्ठलवाडी वाडी वय ७७ हे धरणाच्या ओढ्या लगत असलेल्या शेतात गेले होते. मात्र बराचवेळ होऊन्ही ते परत आले नसल्याने त्यांना शोधण्यासाठी त्यांचा नातू शेतात गेला असता त्याला आजोबा शेतात म्रृत अवस्थेत पडलेले दिसले. त्याने त्वरीत डोणगाव पोलीस स्टेशनला याबाबतची माहिती दिली. यावेळी डोणगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमरनाथ नागरे, पि. एस आय पवार व पोकॉ पवन गाभणे तसेच चालक चव्हाण यांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली व पाहणी केली असता, सदर व्रृध्दाच्या डोक्यावर मार असल्याने घातपात असल्याचा संशय ठाणेदार अमरनाथ नागरे यांना आला. त्यांनी आपल्या पथकासह परिसरात पाहणी सुरू केली पण काहीच हाती लागेना. बाजूच्या शेतातील राखणदार देविदास चंद्रभान जामकर रा. सोनोना ता. पातुर जि. अकोला वय ५५ हा शेतात नसल्याने पोलीसांचा संशय बळावला व ठाणेदार अमरनाथ नागरे व पोकॉ पवन गाभणे यांनी परिसरातील शेतात पाहणी केली असता देविदास चंद्रभान जामकर हा एका शेतात झुडपाआड लपून बसलेला दिसून आला. पोलीसांनी त्याला संशयित म्हणून ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून विचारपूस केली असता आरोपीने शेतात किरकोळ वाद झाला व हाणामारी होऊन म्रृतकाच्या डोक्यात काठीने वार केल्याने मखराम चतरु राठोड यांचा म्रृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणी आरोपीविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
