वाशिम : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत आयोजित आंतरराज्य शेतकरी अभ्यास दौऱ्यास सोमवारी सकाळी ११ वाजता रवाना झाले. वाहनाला जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवूविण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सहभागी शेतकऱ्यांशी संवाद साधत, या अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून आधुनिक कृषी तंत्रज्ञान, मूल्यवर्धन तसेच बाजारपेठेच्या संधी समजून घेण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

याप्रसंगी प्रकल्प संचालक आत्मा अनिसा महाबळे, प्रकल्प उपसंचालक आत्मा वाशिम अजय मोरे, सीएम फेलो संकेत नरुटे, संबंधित अधिकारी व सहभागी शेतकरी उपस्थित होते. प्रकल्प संचालक आत्मा वाशिम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या आंतरराज्य अभ्यास दौऱ्यात शेतकरी उत्पादक कंपनी तसेच शेतकरी गटांतील उत्पादक व उद्यमी अशा एकूण २० शेतकरी सहभागी झाले आहेत. १५ ते २० डिसेंबर या कालावधीत या अभ्यास दौऱ्यांतर्गत नांदेड येथील कापूस संशोधन केंद्र, बंगळुरू येथील श्री इन्स्टिट्यूट ऑफ एग्रीकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, नॅचरल फार्मिंग सेंटर, न्यूट्री प्लॅनेट, सफल मार्केट, आय.आय.एच.आर. हिसरगट्टा तसेच सोलापूर येथील डाळिंब संशोधन केंद्र व कोरडवाहू पिके संशोधन केंद्र येथे भेटी दिल्या जाणार आहेत. या अभ्यास दौऱ्यात प्रक्रिया उद्योग, मार्केटिंग, पॅकेजिंग, मूल्यवर्धन तसेच न्यूट्री बार निर्मिती यांसारख्या विषयांवर विशेष भर देण्यात आला असून शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव आणि कृषी उद्यमशीलतेच्या नव्या संधींबाबत सखोल माहिती मिळणार आहे.