सीटीएमके शाळेच्या इमारतीवरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

जालना :  शहरातील सीटीएमके शाळेच्या इमारतीवरून एका 13 वर्षांच्या विद्यार्थिनीने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना  शुक्रवार, 21 नोव्हेंबर रोजी सकाळी घडली. या धक्कादायक घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. 

जालना :  शहरातील सीटीएमके शाळेच्या इमारतीवरून एका 13 वर्षांच्या विद्यार्थिनीने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना  शुक्रवार, 21 नोव्हेंबर रोजी सकाळी घडली. या धक्कादायक घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. आरोही दीपक बिटलान असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.शाळेच्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या तिने केल्याची प्राथमिक पोलिस सूत्रांकडून देण्यात आली आहे. 

    या घटनेची माहिती मिळताच सदरबाजार पोलीस तत्काळ शाळेत दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, मयत विद्यार्थिनीच्या पालकांनी  शाळेतील काही शिक्षकांवर सतत मानसिक छळ आणि त्रास देत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. कुटुंबाचे म्हणणे आहे की, “आरोहीवर दबाव टाकला जात होता. याबाबत शाळा प्रशासनाला वारंवार तक्रारी केल्या, परंतु कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.” त्यामुळे मुलगी नैराश्यात गेल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची प्राथमिक नोंद घेत तपास वेगाने सुरू केला आहे. कुटुंबीयांचे जबाब नोंदवले जात असून, संबंधित शिक्षक व शाळा प्रशासनाचीही चौकशी सुरू आहे. आवश्यक असल्यास पुढील गुन्हे दाखल केले जातील, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, या दुःखद घटनेमुळे शहरात शोककळा आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. शाळांमधील विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबाबत जागरूकता आणि तातडीच्या उपाययोजनांची गरज असल्याचे मतही या दुर्घटनेमुळे व्यक्त होत आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

चौकशी करावी

दरम्यान, या घटनेची  माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन या मुलींला कुणी ढकलून दिले की तिने आत्महत्या केली, याबाबत पोलिसांनी चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »