अवैध वाळू वाहतुकी विरोधात एलसीबीचा एल्गार; अंढेरा हद्दीत दोन दिवसात ६६ लाखांचा मुद्देमाल जप्त 

अंढेरा  :  अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीचे केंद्र बनलेल्या अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत ‘एलसीबी’ने  कारवाईस्त्र उगारले आहे.  गुन्हे शाखेच्या पथकाने एल्गार पुकारत पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वात सलग दोन दिवस कारवाया करीत टिप्पर सह एकूण ६६ लाखांच्या मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

अंढेरा  :  अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीचे केंद्र बनलेल्या अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत ‘एलसीबी’ने  कारवाईस्त्र उगारले आहे.  गुन्हे शाखेच्या पथकाने एल्गार पुकारत पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वात सलग दोन दिवस कारवाया करीत टिप्पर सह एकूण ६६ लाखांच्या मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

  कोनड खु. शिवारात नाकाबंदी दरम्यान एक  पांढऱ्या रंगाचे  टिप्पर अडविण्यात आले होते. या  वाहनातून सहा ब्रास अवैध वाळू (किंमत६० हजार) मिळून आली. वाहनाची किंमत ३० लाख असून एकूण ३० लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पीएसआय प्रताप बाजड,  हेड कॉन्स्टेबल  शरद गिरी, पुरषोत्तम आघाव, निलेश राजपूत, विकास देशमुख यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.  गुरुवारी उत्तररात्री दिग्रस शिवारात नाकाबंदी केली असता विना नंबरचे टिप्पर पोलिसांनी पकडले. यामध्ये, चार  ब्रास वाळू (किंमत ४० हजार) मिळाली. टिप्पर किंमत ३५ लाख असून असा एकूण ३५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पीएसआय अविनाश जायभाये, हेड कॉन्स्टेबल जगदेव टेकाळे,  दिगंबर कपाटे, पोलीस कर्मचारी  अनंता फरतळे,  दिपक वायाळ यांनी ही कारवाई पार पाडली.  दोन्ही टिप्पर अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आले असून आरोपींवर  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह 

अंढेरा पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध वाळू होत असल्याचे या कारवाईमुळे उघडकीस आले आहे. यावर अंकुश लावणे ही स्थानिक पोलिसांची देखील जबाबदारी आहे. मात्र, एलसीबीच्या पथकाने वाळू वाहतूक प्रकरणी केलेल्या कारवाईमुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »