dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

अवैध वाळू वाहतूक;  दोन जणांना अटक ; अंचरवाडी शिवारात एलसीबीची कारवाई  

अंढेरा :  पोलीस स्टेशन हद्दीतील अंचरवाडी शिवारात ४ ऑक्टोबरच्या उत्तररात्री  गस्तीवर असताना स्थानिक  गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडले.

 

अंढेरा :  पोलीस स्टेशन हद्दीतील अंचरवाडी शिवारात ४ ऑक्टोबरच्या उत्तररात्री  गस्तीवर असताना स्थानिक  गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडले. 

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली, देऊळगाव राजा तालुक्यात अवैध वाळू वाहतूक  होत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. यामुळे, पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशावरून  वाळू वाहतूक प्रकरणी  कारवाईसाठी गुन्हे शाखेला आदेशित करण्यात आले होते.  दरम्यान, ४ ऑक्टोबर रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास चिखली तालुक्यातील अंचरवाडी शिवारात  एका टिप्परमध्ये अवैध वाळूसाठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याआधारे, उपरोक्त ठिकाणी गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला असता पिवळ्या रंगाचे एक टिप्पर उभे दिसले. यामध्ये, अंदाजे दोन ब्रास वाळू (किंमत,२० हजार) आढळून आली. चालकाला परवाना बाबत विचारणा केली असता, विनापरवाना वाळू वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले. यावरून टिप्पर जप्त करून चालक आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली. या कारवाईत एकूण १५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे प्रमुख सुनील आंबुलकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजार, हेडकॉन्स्टेबल दिगंबर कपाटे, कॉन्स्टेबल निलेश राजपूत, चालक समाधान टेकाळे यांनी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top