मलकापूर येथे भरधाव कारची  ट्रेलरला धडक, कार चालकासह चौघांचा मृत्यू 

मलकापूर : भरधाव कार चालकाने पाठीमागून  ट्रेलरला धडक दिल्याने कारचालकासह चौघांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. तसेच कार मधील इतर पाच जण सुद्धा गंभीर स्वरूपाने जखमी झाले आहे. सदर घटना मलकापूर राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी पहाटे दरम्यान घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर नजीकच्या राष्ट्रीय महामार्गावर पहाटे ४ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. मुक्ताईनगरकडून मलकापूरच्या दिशेला जाणाऱ्या लेनवर ही घटना घडली. भुसावळवरून मलकापूरच्या दिशेला जाणाऱ्या कारने ट्रेलरला धडक दिली. चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि ही कार ट्रेलरला जाऊन धडकली. या अपघातामध्ये कारचालक साजिद अजीज बागवान यांच्यासह ३ महिला महिला असे एकूण चौघांचा जागीच मृत्यू झाला. ३ मृत महिलांची अजूनही ओळख पटू शकली नाही. हे सर्वजण कारने प्रवास करत होते. चालक साजिदचे चालकाचे नियंत्रण सुटल्याने या कारने ट्रेलरला पाठीमागून धडक दिली. या प्रकरणी मलकापूर येथील दसरखेड एमआयडीसी पोलिसांनी चौघांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या अपघात प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »