वाशिम : जिल्ह्यात १ सप्टेंबर रोजी सायंकाळपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. रात्री ७ वाजल्यानंतर पावसासोबत विजांचा कडकडाट व वाऱ्याच्या जोरामुळे शहरातील अनेक भागात अडथळे निर्माण झाले. रात्री साडेआठच्या सुमारास वाशिम शहरातील बाकलीवाल कॉलेजसमोर अचानक मोठे झाड कोसळून अपघात घडला. या घटनेत तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

झाड कोसळल्यामुळे बाकलीवाल कॉलेज मार्गे छत्रपती शिवाजी महाराज रोडकडे जाणारा मुख्य मार्ग बंद झाला होता. काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली. अपघातानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
नागरिकांनी तातडीने प्रशासनाला कळवून झाड हटविण्याची मागणी केली. मात्र, पावसामुळे मदतकार्य उशिरा सुरू झाले. शहरातील इतर भागांमध्येही पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले होते. यामुळे वाहनधारक व पादचारी यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.