गोवंशाची कत्तल करणाऱ्यांवर कारवाई; सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल

पिंप्रीराजा : छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पिंप्रीराजा येथील एका वाड्यात अवैधरित्या गोवंशाची कत्तल करणाऱ्यावर करमाड पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीस अटक करीत त्याच्या तावडीतून एक कार, जनावर कत्तलीसाठी लागणारे साहित्य असा एकूण 6 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई रविवार, 31 ऑगस्ट रोजी करण्यात आली.

पिंप्रीराजा परिसरातील एका वाड्यात गोवंशाची कत्तल करण्यात येत असल्याची माहिती करमाड पोलिसांना मिळाली होती. करमाड पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक भारत निकाळजे, पोलिस अंमलदार जयसिंग नागलोत, शिवाजी मदेवाड आदींच्या पथकाने रविवारी पिंप्रीराजा येथील आरेफ कुरैशी यांच्या वाड्यात धाड टाकली. त्यावेळी आरेफ कुरैशी, नाजीम कुरैशी, साहिल अन्वर कुरैशी, सोफीन अन्वर कुरैशी आणि त्यांचे दोन साथीदार चार गोवंशीय जनावरे कापताना आढळून आले. पोलिस आल्याचे पाहताच आरेफ कुरैशी, नाजीम कुरैशी यांच्यासह दोन जणांनी घटनास्थळावरुन धूम ठोकली. पोलिसांनी घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पवार यांना बोलावून घेत गोवंशाचे सॅम्पल घेतले. या कारवाईत पोलिसांनी चार गोवंशाचे मांस, एक कार, जनावर कत्तलीसाठी लागणारे साहित्य असा एकूण 6 लाख 20 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी फरार आरोपी आरेफ कुरेशी, नाजीम कुरेशी, साहील अन्वर कुरेशी, सोफीन अन्वर कुरेशी, सर्व रा. पिंप्रीराजा, यांच्यासह दोन जणांविरुध्द करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »