dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

मुसळधार पावसाने धामना नदीला पूर

जाफ्राबाद :  गेल्या तीन ते चार दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे जाफ्राबाद तालुक्यातील नदी-नाल्यांना पूर आला आहे. रविवार, 17 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाडा-विदर्भाच्या सिमेवरील इरला-चांडोळ रस्त्यावरील धामणा नदीला पूर आला होता. पुराचे पाणी पुलावरुन वाहत असल्याने सोमवार, 18 ऑगस्ट रोजी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

जाफ्राबाद तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसापासून रिमझिम पाऊस पडत होता. रविवारी मध्यरात्रीपासून तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नदी-नाल्यांना पूर आला आहे. जोरदार पावसामुळे धामणा नदीला पूर आला असून मराठवाडा-विदर्भाच्या सिमेवरील इरला-चांडोळ रस्त्यावरील पुलावरुन पुराचे पाणी वाहत असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नदी ओव्हर फ्लो होवून वाहत असल्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, जाफ्राबाद तालुक्यातील धामणा नदीसह पूर्णा, केळणा या नद्यांना देखील पूर आला असून पावसाचे पाणी पिकांमध्ये साचले असून पिके वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top