शेगाव : येथील महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित महात्मा फुले विद्यालय शेगाव येथे शुक्रवार १५ ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा उपक्रम अंतर्गत यशवंत विद्या मंदिर चे सन्मानिय उपाध्यक्ष गजानन डिगांबर काठोळे यांचे हस्ते मोठ्या उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले.

या प्रसंगी महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्मानिय अध्यक्ष संजय कलोरे, उपाध्यक्ष गजानन हाडोळे, सचिव विलास मसने, सहसचिव पुरुषोत्तम हुसे, संचालक विनायक घाटोळ , महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय चे अध्यक्ष महादेव शेगोकार,मुख्याध्यापक अमोल चिंचोळकर, पर्यवेक्षक शशिकांत घाटोळ, महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय च्या प्रभारी मुख्याध्यापिका नावकार मॅडम, यशवंत विद्या मंदिर चे मुख्याध्यापक राजेंद्र लाड यांची उपस्थिती होती.
तसेच हर घर तिरंगा उपक्रम अंतर्गत विद्यालयातील सर्व गुणवंत विद्यार्थी यांची शालेय गणवेशातील उपस्थिती उल्लेखनीय होती.या यावेळी विद्यालयात सर्वश्री शिक्षक, अरुण पांडे , अजय धनोकर, नितीन वाढे, मदन जाधव, गणेश भटकर, कुलदीप लोखंडे, रवींद्र मसने , वरिष्ठ लिपीक, अनंत मसने यांचेसह विविध शिक्षकांची उपस्थिती लाभली. तसेच उपक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक, तसेच पर्यवेक्षक,शिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले.