dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

जळगाव जामोद तालुक्यात  दीड वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार;  आरोपी अटक

जळगाव जामोद :  तालुक्यातील एका गावातील एका ५५ वर्षीय नराधमाने १८ महिन्याच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना ५ ऑगस्ट रोजी समोर आली आहे. याविषयी पीडित चिमुकलीच्या आईने जळगाव जामोद पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

पीडित चिमुकलीच्या आईने तक्रारीत म्हटले आहे की,  मी व माझी १८ महिन्याची मुलगी घरी असताना आरोपी मधुकर पुंजाजी हागे वय वर्ष 55 हा घरी येऊन माझ्या मुलीला आंबा खायला देतो, असे म्हणून त्याचे घरी घेऊन गेला. अर्ध्या तासाने त्यांनी मुलीला माझ्या घरी घेऊन आला. तेव्हा ती रडत होती. त्यामुळे तिचे कपडे काढून पाहिले तेव्हा तिच्या छातीला थोडेसे लालसर झालेले दिसले व तिचे इतर अंग सुद्धा लाल झालेले दिसले आरोपीने बळजबरीने मुलीवर अत्याचार केला, अशी तक्रार फिर्यादीने दिली आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी मधुकर पुंजाजी हागे या नराधमा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ आरोपी मधुकर पुंजाजी हागे याला अटक केली. पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय नागेश मोहोळ हे करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top