dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

वरातीत नाचण्याच्या कारणावरून भांडण; सोळा वर्षांच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या 

जालना : एका लग्नाच्या वरातीत नाचण्यावरून मित्रांमध्ये वाद झाला. दरम्यान,  यानंतर एका सोळा वर्षांच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. रोहन राहुल साळवे असे मयत मुलाचे नाव आहे. ही घटना जालना शहरातील चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवार, 18 एप्रिल रोजी मध्य रात्रीनंतर घडली.  

   याबाबत चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी 

रात्री चंदनझिरा भागात एका लग्नाची वरात निघाली आणि वरातीमध्ये मित्रामित्रांची भांडणे झाली.  यात रोहन साळवे होता. त्याच्या वडिलांनी त्याला घरी नेले. त्या पाठोपाठच रोहनचे मित्र देखील हातात काही शस्त्र घेऊन रोहनच्या घरासमोर आले. दरम्यान,   घरासमोर त्यांच्यातील  भांडणे मिटविण्यात आले.  त्यानंतर रात्री उशिरा रोहन साळवे याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.  रात्री दीड वाजता रोहन साळवे याला त्याच्या घरच्यांनी उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले. परंतु तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले .याप्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान शविच्छेदन केल्यानंतर अकरावाजेच्या सुमारास रोहनचा मृतदेह  नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top