dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

“लबाडांनो पाणी द्या” अनोखे आंदोलन..! शिवसेना बांधणार शहराच्या प्रवेशद्वाराला रिकाम्या हंड्याचे तोरण…

छत्रपती संभाजीनगर :   मनपाकडे वार्षिक पाणी पट्टी भरून टँकरच्या पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत. या प्रश्नावर आता शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला असून शुक्रवारी १८ एप्रिल रोजी शिवसेना शहराच्या प्रवेशद्वाराला रिकाम्या हंड्याचे तोरण बांधून अनोखे आंदोलन करणार आहे. सोबतच सत्ताधाऱ्यांकडे  “लबाडांनो पाणी द्या” अशी मागणी कणार आहे.

छत्रपती संभाजीनगर :  शहराच्या पाणीपुरवठा योजनेवर तब्बल २ हजार ७४० कोटी रूपये खर्च होत असताना नागरिकांना पाण्यासाठी दहा ते बारा दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. मनपाकडे वार्षिक पाणी पट्टी भरून टँकरच्या पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत. या प्रश्नावर आता शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला असून शुक्रवारी १८ एप्रिल रोजी शिवसेना शहराच्या प्रवेशद्वाराला रिकाम्या हंड्याचे तोरण बांधून अनोखे आंदोलन करणार आहे. सोबतच सत्ताधाऱ्यांकडे  “लबाडांनो पाणी द्या” अशी मागणी कणार आहे.

या आंदोलनाची माहिती देताना पदाधिकारी म्हणाले की, शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शहराच्या पाणी प्रश्नावर एल्गार पुकारला असून महानगरपालिकेचे पाणीपुरवठा वितरण व्यवस्था सुरळीत होण्यासाठी पुढील एक महिना वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करण्यात येणार आहे. 

शुक्रवारी सकाळी १० वाजता शहरातील बाबा पेट्रोल पंप, मुकुंदवाडी चौक कमान, रेल्वे स्टेशन उड्डाणपूल व हर्सूल टी पॉइंट या चार ठिकाणी रिकाम्या हंड्यांचे तोरण बांधून आंदोलन करण्यात येणार आहे. बाबा पेट्रोल पंप येथे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, उपजिल्हाप्रमुख आनंद तांदुळवाडीकर, विधानसभा संघटक गोपाल कुलकर्णी, महिला आघाडी मध्य विधानसभा शहरसंघटक सुनिता सोनवणे,मुकुंदवाडी चौक कमान येथे शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब डांगे,संतोष जेजुरकर, ज्ञानेश्वर डांगे, विधानसभा संघटक दिग्विजय शेरखाने, महिला आघाडी सहसंपर्क संघटक दुर्गा भाटी, महानगर संघटक सुकन्या भोसले, रेल्वे स्टेशन उड्डाणपूल येथे सह संपर्क संघटक त्र्यंबक तुपे, उपजिल्हाप्रमुख किशोर कच्छवाह, शहरप्रमुख हरिभाऊ हिवाळे, महिला आघाडी संपर्क संघटक सुनिता आऊलवार, जिल्हा संघटक आशा दातार, सहसंपर्क संघटक सुनिता देव, अनिता मंत्री व हर्सूल टी पॉइंट येथे महानगर प्रमुख राजू वैद्य, शहर प्रमुख बाळासाहेब थोरात व महानगर संघटक मीना फसाटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडणार आहे.

याप्रसंगी युवासेना सहसचिव उपसचिव ऋषिकेश खैरे, ॲड. धर्मराज दानवे, जिल्हा युवा अधिकारी हनुमान शिंदे,युवतीसेना सहसचिव सानिका देवराज, जिल्हा युवती अधिकारी रोहिणी पिंपळे व जिल्हा समन्वयक दिपाली पाटील बोरसे हे ही उपस्थित असणार आहे.

संभाजीनगर वासियांसह शिवसेना पदाधिकारी आणि शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, अंगीकृत संघटना, आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top