dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार, घरमालकास अटक

छत्रपती संभाजीनगर : भाडेकरुच्या पाच वर्षीय बालिकेवर ३८ वर्षीय घरमालकाने अत्याचार केल्याची घटना बुधवार, १५ मार्च रोजी शहरातील एका भागात घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी घरमालकाविरुध्द पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी घरमालकाचे शहरातील एका भागात घर असून त्यांच्याकडे भाडेकरु म्हणून एक कुटुंबिय राहते. या कुटुंबातील पाच वर्षीय चिमुकलीला आरोपी घरमालकाने चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून तिच्यासोबत लैंगिक चाळे करीत तिच्यावर अत्याचार केला होता. हा प्रकार पीडित मुलीच्या कुटुंबियाच्या लक्षात आल्यावर त्यांनी जिन्सी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी घरमालकाविरुध्द जिन्सी पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल होताच जिन्सी पोलिसांनी आरोपी घरमालकास अटक केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top