Chhatrapati Sambhajinagar Crime News :गुटखा विक्रेत्यांवर कारवाइ; दोघांना अटक

Chhatrapati Sambhajinagar Crime News : महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधीत करण्यात आलेल्या गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा साठा करुन विक्री करणाऱ्या देान जणांवर पोलिसांनी शनिवार, 9 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास कारवाई केली.

छत्रपती संभाजीनगर :  महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधीत करण्यात आलेल्या गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा साठा करुन विक्री करणाऱ्या देान जणांवर पोलिसांनी शनिवार, 9 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी दोघांच्या ताब्यातून एक कार आणि गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा साठा असा एकूण 10 लाख 18 हजार रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल विलास शिंदे आणि सौरभ काशीनाथ आरगडे, दोघे रा. गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर अशी अवैधरित्या गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा साठा करुन विक्री करणाऱ्यांची नावे आहेत. सायबर पोलिस ठाण्याचे पथक एमआयडीसी वाळूज परिसरात गस्तीवर असतांना एका कारमधुन महाराष्ट्रात प्रतिबंधीत करण्यात आलेला गुटखा व सुगंधी तंबाखूची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून पांढऱ्या रंगाची हुंडाई कार अडवली. पोलिसांनी कारमधुन अमोल शिंदे व सौरभ आरगडे यांना ताब्यात घेत, कारची झडती घेतली असता त्यामध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधीत करण्यात आलेल्या गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा साठा मिळून आला. गुटखा व सुगंधी तंबाखूचा साठा करुन विक्री करणाऱ्या दोघांविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »