Accident near Pachapirwadi : पाचपीरवाडी फाट्याजळील अघतात एकजण ठार

 Accident near Pachapirwadi

 Accident near Pachapirwadi : छत्रपती संभाजीनगर येथून कन्नडकडे जाणाऱ्या दुचाकीस्वारास अज्ञात वाहनाने उडवले. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना 6 ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता दरम्यान घडली.

 Accident near Pachapirwadi
Accident near Pachapirwadi

पाचपीरवाडी : छत्रपती संभाजीनगर येथून कन्नडकडे जाणाऱ्या दुचाकीस्वारास अज्ञात वाहनाने उडवले. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना 6 ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता दरम्यान घडली.
दुचाकी क्रमांक (एमएच-२०-एआर-३५७२) वरील चालक प्रकाश भुजंगराव मोहिते (48, रा. टापरगाव, ता. कन्नड) धुळे- सोलापूर मार्गावरुन प्रवास करीत असताना ६ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता दरम्यान पाचपीरवाडी फाट्याजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मोहिते हे गंभीर जखमी झाले. मोहिते यांच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात इजा झाल्याने रक्तस्राव होऊन ते जागेवरच ठार झाले. महामार्ग पोलीस खुलताबादचे पोलीस निरीक्षक शिरसाट, पीएसआय लोखडे, एएसआय नरोटे, एच. सिचेळेकर, शांताराम सोनवणे यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला तर मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पुढील तपास शिल्लेगाव पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »