Legislative Council : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत निसटता पराभव झालेल्या पंकजा मुंडे यांच्यासह एकूण पाच जणांना भाजपाने उमेदवारी जाहीर केली आहे. पंकजा मुंडे यांच्यासह परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांची विधान परिषदेवर वर्णी लागली आहे.
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी या महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत निसटता पराभव झालेल्या पंकजा मुंडे यांच्यासह एकूण पाच जणांना भाजपाने उमेदवारी जाहीर केली आहे. पंकजा मुंडे यांच्यासह परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांची विधान परिषदेवर वर्णी लागली आहे.
विधान परिषदेचे हे आमदार विधान परिषद सदस्यांमार्फत निवडले जाणार आहेत. त्यामध्ये महायुतीचे संख्याबळ पाहता भाजपाचे पाच उमेदवार विजयी होऊ शकतात. त्यानुसार भाजपाने पाच जणांना आपल्याकडून संधी दिली आहे. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २ जुलै आहे. तत्पूर्वी सोमवारी भाजपाकडून आपल्या विधान परिषद उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहेत. त्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपेक्षेप्रमाणे लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने त्यांना विधान परिषदेसाठी संधी दिली गेली आहे. सोबतच विदर्भातून परिणय फुके तर पुण्यातून योगेश टिळेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीमधील मित्रपक्षांमधून सदाभाऊ खोत यांचाही समावेश आहे.