Maharashtra Lok Sabha Election Result 2024: फेरनिहाय मतमोजणी सुरू असून, राज्यातील मराठवाडा विभागातील आठ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला कल मिळताना दिसत आहे. तेव्हा मराठवाड्यात कोण पुढे कोण मागे हे वाचा आता एका क्लिकवर.
छत्रपती संभाजीनगर : फेरनिहाय मतमोजणी सुरू असून, राज्यातील मराठवाडा विभागातील आठ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला कल मिळताना दिसत आहे. तेव्हा मराठवाड्यात कोण पुढे कोण मागे हे वाचा आता एका क्लिकवर.
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात सध्या महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे आघाडीवर आहेत. तर खैरे आणि इम्तियाज हे पिछाडीवर आहेत. तर जालन्यात काँग्रेसचे कल्याण काळे आघाडीवर असून, भाजपाचे रावसाहेब दानवे पिछाडीवर आहेत. तिकडे धाराशिवमध्येही ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर पन्नास हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर बीडमध्ये शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे त्यांची लीड कायम राखून आहेत. यासोबतच परभणीत बंडू जाधव 20,844 मतांनी आघाडीवर; 5 व्या फेरीत मोठा लीड मिळाला आहे. येथे वंचितचे पंजाबराव डख आणि रासपचे महादेव जानकर पिछाडीवर आहेत. लातूर लोकसभा मतदारसंघात सकाळी 10 वाजेपर्यंत कॉंग्रेसचे शिवाजी काळगे आघाडीवर, सुधाकर श्रृंगारे पिछाडीवर तर नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर हे आघाडीवर आहेत.