Akola Crime : दुहेरी हत्याकांडाने अकोला पुन्हा हादरलं

Akola is shaken again by a double murder

Akola Crime: नांदायला येत नसल्याचा राग मनात धरुन पतीने गाढ झोपेत असलेल्या पत्नीसह ९ वर्षांच्या मुलीची कुऱ्हाडीने वार करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीवर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

Akola is shaken again by a double murder
Akola is shaken again by a double murder

अकोलाः  नांदायला येत नसल्याचा राग मनात धरुन पतीने गाढ झोपेत असलेल्या पत्नीसह ९ वर्षांच्या मुलीची कुऱ्हाडीने वार करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीवर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. रामदास पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत गत आठवडाभरात दुहेरी हत्याकांडाची ही दुसरी घटना आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रश्मी म्हात्रे (वय २७) आणि माही म्हात्रे (वय ९) अशी मृतांची नावे आहेत.याप्रकरणी पोलिसांनी मनीष म्हात्रे (वय ३०) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मनीष आणि रश्मी यांच्यात नेहमी वाद होत होता. पतीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून रश्मी माहेरी निघून गेली होती.पत्नी सासरी नांदायला येत नसल्याचा राग पतीच्या मनात होता.पती मनीष म्हात्रे हा अनेकदा पत्नीला भेटीसाठी तिच्या माहेरी जात होता.परंतु मनधरणी करुनही पत्नी सासरी नांदायला येण्यास नकार देत होती.
दरम्यान, मंगळवार २३ एप्रिल रोजी म्हात्रे कुटुंबात लग्न असल्याने रश्मी आणि मुलगी माही हे दोघेही अकोल्यात सासरी आले होते.रात्री उशिराही मनीषनं पत्नीला सासरी राहायला म्हटल,पण तिने नकार दिला.याच गोष्टीचा राग मनात धरुन आरोपी मनीषने गाढ झोपेत असलेल्या पत्नीसह मुलीवर कुऱ्हाडीने हल्ला केला. यामध्ये दोघींचाही जागीच मृत्यू झाला.या दुहेरी हत्याकांडाची माहिती मिळताच रामदास पेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले.या प्रकरणात खुनाचे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोज बहुरे करीत आहेत.

७ दिवसांआधीही अकोल्यात दुहेरी हत्याकांड

मागील ७ दिवसांपूर्वी अकोल्यातल्या रामदास पेठ पोलिस स्टेशन हद्दीत अतुल थोरात आणि राज गायकवाड यांची धारदार शास्त्रांनी हत्या करण्यात आली. रेल्वे स्टेशन आणि देशमुख फ़ैल चौकात ही हत्या झाली. तिघांनी अतुल आणि राजवर धारदार शास्त्रान वार करून जागीच संपवलं.
रामदास पेठ पोलिसांनी २४ तासात तिनही आरोपींना गजाआड केलं असून मारेकरी मनीष भाकरे, ऋषिकेश आपोतीकर आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली होती. अगदी शुल्लक करून या तिघांनी अतुल आणि राजला यांचा खून केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »