Four people were killed in a vehicle accident: लग्नाला निघालेल्या वऱ्हाडाचा देऊळगाव राजा तालुक्यातील दगडवाडी फाट्याजवळ अपघात झाल्याची घटना बुधवार १७ एप्रिल रोजी रात्री उशीरा घडली. अपघातात चिखली तालुक्यातील अंबाशी येथील चौघांचा मृत्यू झाला, तर चौघे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
बुलढाणा: लग्नाला निघालेल्या वऱ्हाडाचा देऊळगाव राजा तालुक्यातील दगडवाडी फाट्याजवळ अपघात झाल्याची घटना बुधवार १७ एप्रिल रोजी रात्री उशीरा घडली. अपघातात चिखली तालुक्यातील अंबाशी येथील चौघांचा मृत्यू झाला, तर चौघे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
चिखली तालुक्यातील अंबाशी येथील रहिवासी स्कार्पियो वाहनाने जालना कडे निघाले होते. दरम्यान देऊळगाव राजा तालुक्यातील दगडवाडी फाट्याजवळ वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन उलटले यात अंबाशी येथील वसंत देशमुख, अशोक भीमराव नायक, विलास जयवंत देशमुख हे जागीच ठार झाले. तर, वाहनाचा चालक योगेश लक्ष्मण देशमुख याला उपचारासाठी नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात गोपाल आबाराव देशमुख, शालिनी देशमुख, मीरा संजय देशमुख, अक्षरा संदीप देशमुख हे जखमी झाले असून त्यांच्यावर देऊळगाव राजा येथे उपचार सुरू आहेत