dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

गोठ्यात शिरला बिबट्या ; 12 बकऱ्यांचा फडशा | कोलारा शिवारातील घटना : परिसरात भीतीचे वातावरण  

चिखली :  तालुक्यातील कोलारा शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला असून, बकऱ्यांच्या गोठ्यात प्रवेश करत तब्बल 12 बकऱ्यांना ठार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी  सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.  

चिखली :  तालुक्यातील कोलारा शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला असून, बकऱ्यांच्या गोठ्यात प्रवेश करत तब्बल 12 बकऱ्यांना ठार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी  सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.  

  विश्वनाथ सुखदेव सोळंकी यांचे बालगाव भाग दोन शिवारातील शेतात जनावरांचा गोठा आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून त्यांनी या ठिकाणी 12 बकऱ्यांसह अन्य जनावरे पाळली. याच व्यवसायातून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लागत होता. मंगळवारी सकाळी जेवण आटोपून पुन्हा शेतात गेल्यानंतर बकऱ्यांच्या गोठ्याजवळील दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. बिबट्याने गोठ्याच्या जाळीखालून आत प्रवेश केला होता. गोठ्यातील 12 बकऱ्यांना ठार करून त्यांचा फडशा पाडण्यात आला. 

वन विभागावर गंभीर आरोप!

कोलारा परिसरातील शेतशिवारात अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिली होती. संभाव्य धोका लक्षात घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र, या तक्रारींची वेळीच दखल घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. 

नुकसान भरपाईची मागणी 

वनविभागाने या घटनेला गांभीर्याने घेऊन बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात आणि नुकसानग्रस्त विश्वनाथ सोळंकी यांना शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top