dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

12 हजार मेंढ्या, 2 हजार पिल्ले अन्‌‍ 25 उंटांचा ताफा निमखेडी सीमेवर रोखला

जळगाव जामोद :  दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील पशुधनासाठी चाऱ्याची टंचाई भासू नये, म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या गुराढोरांवर जिल्हाबंदीचे आदेश लागू केले आहेत. या आदेशाची कडक अंमलबजावणी करत 15 नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात दाखल झालेला सुमारे 12 हजार मेंढ्या, 2 हजार पिल्ले आणि 25 उंटांचा मोठा ताफा जळगाव जामोद तालुक्यातील निमखेडी येथील वनविभागाच्या चेकपोस्टवर रोखण्यात आला.

            सातपुडा पर्वतरांगांतील महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरून हा मेंढपाळांचा काफिला बुलढाण्यात आला होता. एवढ्या मोठ्या संख्येने प्राण्यांचा ताफा पाहून परिसरात खळबळ उडाली. मात्र, प्रशासनाने आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांच्यासह स्थानिकांनी जिल्हाबंदीचे आदेशाचे पालन करत त्यांना हद्दीत प्रवेशास मज्जाव केला. यामुळे काही वेळ तिथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित मेंढपाळ अमरावती जिल्ह्याच्या दिशेने जात असल्याचे सांगत परवानगी मागितली, मात्र प्रशासनाने आदेशाचे कारण देत प्रवेश नाकारला. दरम्यान, भुकेल्या व तहानलेल्या जनावरांच्या स्थितीमुळे मेंढपाळांसमोर अडचण निर्माण झाली होती. अखेर वनविभागाने त्यांना एका रात्रीच्या मुक्कामाची परवानगी देऊन त्यानंतर परत जाण्यास सांगितले. या संपूर्ण कारवाईसाठी वनविभाग, पोलीस आणि एसआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top