dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

काम सुरू असतानाच विहिरीचा कडा ढासळला; दोघांचा मृत्यू

अनसिंग  : शेतातील हळदीचे पीक वाचविण्यासाठी नवीन विहिरीचे खोदकाम सुरू असताना अचानक मातीचा कडा कोसळून दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची  घटना १६ नोव्हेंबर रोजी सकाळी जवळा शेतशिवारात घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृत मजुरांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

जवळा शेतशिवारातील घटना; अंबापूर आणि इसई गावांवर शोककळा

अनसिंग  : शेतातील हळदीचे पीक वाचविण्यासाठी नवीन विहिरीचे खोदकाम सुरू असताना अचानक मातीचा कडा कोसळून दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची  घटना १६ नोव्हेंबर रोजी सकाळी जवळा शेतशिवारात घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृत मजुरांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एकांबा येथील शेतकरी हरिभाऊ सुभाष वाबळे यांच्या जवळा शेतशिवारातील शेतात हळदीचे पीक घेतले आहे. पिकाला पाण्याची आवश्यकता असल्याने सिंचनासाठी नवीन विहीर बांधण्याचे काम सुरू करण्यात आले होते. त्यासाठी विहिरीचे खोदकाम व बांधकाम केले जात असताना १६ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे साडेनऊ वाजताच्या दरम्यान अचानक विहिरीचा मातीचा कडा ढासळला. यावेळी कामावर असलेले दोन मजूर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या दुर्घटनेत संतोष रामदास जामनिगळे (रा. अंबापूर, ता. मंगरूळपीर) आणि वासुदेव श्रीराम धोंगडे (रा. इसई, ता. मंगरूळपीर) हे दोघे गंभीरपणे मातीखाली दबले गेले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. दोन्ही मजुरांना मातीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढून तातडीने अनसिंग येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी तसेच ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. या घटनेप्रकरणी पुढील तपास सुरू असून, विहिरीच्या खोदकामादरम्यान मातीचा कडा कोसळण्यामागील नेमकी परिस्थिती तपासली जात आहे.

दोन गावांवर शोककळा

विहिरीच्या कामादरम्यान घडलेल्या या दुर्घटनेने अंबापूर आणि इसई या दोन्ही गावांमध्ये शोककळा पसरली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मजुरी करणाऱ्या दोघांचा अशा प्रकारे अंत झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

मदतकार्यासाठी ग्रामस्थांची धाव

विहिरीच्या खोदकामादरम्यान मातीचा कडा कोसळल्याची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. यावेळी घटनास्थळी बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top