छत्रपती संभाजीनगर : शहरातील क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस असलेल्या एका घराला रविवार, १५ नोव्हेंबर रोजी दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पदमपुरा येथील मुख्य अग्निशमन केंद्राचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन जवानांनी प्रसंगावधान राखत आणि तत्परतेने आग विझविण्याचे काम केल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळवले असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक एन. खांडेकर यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी सुमारे २ वाजून १० मिनिटांच्या सुमारास क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस असलेल्या एका घराला आग लागल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती नगरसेवक सिद्धार्थ यांनी मुख्य अग्निशमन केंद्राच्या नियंत्रण कक्षाला दिली. माहिती मिळताच मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. अशोक एन. खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअग्निशमन केंद्र अधिकारी विनायक लिमकर, ड्युटी अधिकारी संग्राम मोरे, अग्निशामक जवान रवि दुधे आणि वाहनचालक योगेश दुधे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आवश्यक ती खबरदारी घेत पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. पथकाच्या तत्परतेमुळे काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. शहरातील गजबजलेल्या भागात आगीची घटना घडल्याने परिसरात काही काळ भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेत घरातील संसारउपयोगी साहित्य जळून खाक झाले असल्याचे खांडेकर यांनी सांगितले.