dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

समुद्रात बुडून आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू

श्रीवर्धन : पुण्यातील आळंदी परिसरातील एका महाविद्यालयातील आठ विद्यार्थ्यांचा श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या दिवेआगर समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पाण्याच्या खोलीचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने ही भीषण दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरासह शैक्षणिक वर्तुळातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

दिवेआगर समुद्रकिनारी शोककळा : पाण्याच्या खोलीचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने दुर्घटना 

श्रीवर्धन : पुण्यातील आळंदी परिसरातील एका महाविद्यालयातील आठ विद्यार्थ्यांचा श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या दिवेआगर समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पाण्याच्या खोलीचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने ही भीषण दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरासह शैक्षणिक वर्तुळातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

आळंदी परिसरातील कॉलेजचे काही विद्यार्थी पर्यटनासाठी दिवेआगर येथे आले होते. समुद्राचा आनंद लुटण्यासाठी हे विद्यार्थी पाण्यात उतरले; मात्र पाण्याच्या प्रवाहाचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने आठ विद्यार्थी समुद्राच्या पाण्यात वाहून गेले व त्यांचा बुडून मृत्यू झाला. दुर्घटनेची माहिती मिळताच दिघी सागरी बोर्ली पंचतन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष आवटी हे आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सर्व मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील वैद्यकीय तपासणी व कायदेशीर प्रक्रियेसाठी बोर्ली पंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले आहेत. या दुर्दैवी घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. ऐन पर्यटनाच्या हंगामात घडलेल्या या दुःखद घटनेमुळे दिवेआगर व परिसरात शोककळा पसरली आहे.

दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थींची नावे :

1. यश किरण वानखेडे

2. ⁠सोहम तुकाराम भांडवलकर

3. ⁠तन्मय दत्तात्रय वाहिले

4. ⁠कौस्तुभ संदीप दौंड

5. ⁠कैवल्य वासनकर

6. ⁠राजवीर वहिले

7. ⁠प्रणव बनसोडे

8. ⁠सुमित अहिरे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top