बुलढाणा : राज्यातील १८ जिल्ह्यांचा दुष्काळसदृश्य यादीत समावेश करण्यात आला आहे. मात्र, बुलढाणा जिल्ह्याला या यादीतून वगळण्यात आले. सरकारच्या ह्या जुलूमी निर्णयाविरोधात संतप्त होत जिल्ह्यात कोराडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने सत्ताधारी आमदार व मंत्र्यांच्या विरोधात सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात या आंदोलनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून काँग्रेस कार्यकर्त चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

सत्ताधारी आमदारांना विचारला जबाब तर पालकमंत्र्यांना घालणार घेराव
बुलढाणा : राज्यातील १८ जिल्ह्यांचा दुष्काळसदृश्य यादीत समावेश करण्यात आला आहे. मात्र, बुलढाणा जिल्ह्याला या यादीतून वगळण्यात आले. सरकारच्या ह्या जुलूमी निर्णयाविरोधात संतप्त होत जिल्ह्यात कोराडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने सत्ताधारी आमदार व मंत्र्यांच्या विरोधात सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात या आंदोलनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून काँग्रेस कार्यकर्त चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

बुलढाण्यात बुधवार 16 सप्टेंबर रोजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमदार संजय गायकवाड यांना जबाब विचारण्यात आला. यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगत सरकार लवकरच जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करेल, अशी ग्वाही दिली. तर येत्या आठ दिवसात जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाला नाही तर पालकमंत्र्यांना घेराव घालणार असल्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी सांगितले.
सत्ताधारी सुकाळात, शेतकरी दुष्काळात… सरकारचे धोरण, शेतकऱ्यांचे मरण… सरकार तुपाशी, शेतकरी उपाशी.. बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे… अशा घोषणांनी जयस्तंभ चौक परिसर दणाणून सोडत काँग्रेसच्या सत्याग्रह आंदोलनाला सुरुवात झाली. काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यालयाकडे आगेकूच केली असता संजय गायकवाड स्वतःहून जयस्तंभ चौकात निवेदन स्वीकारायला आले. या वेळी त्यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्षांशी चर्चा केली. आपल्या मागण्या सरकार पर्यंत पोहोचवणार असून बुलढाणा जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील, सतिश मेहेंद्रे, शहराध्यक्ष दत्ता काकस, दिपक रिंढे, तुळशीराम नाईक, रिजवान सौदागर, गणेश पाटील, चित्रांगण खंडारे, युवक प्रदेश सरचिटणीस विश्वदिप पडोळ, मिलींद जयस्वाल, जाकीर कुरेशी, इरफान पठाण ,डॉ पुरुषोत्तम देवकर, पंडितराव चाटे ,उषा चव्हाण, भारत ठेंग गजनफर खान, दिलीप राजपूत ,बबलु कुरेशी ,साहेबराव डोंगरे, सुनील पाटील, श्रीकृष्ण खराटे, अविनाश मोदे, मोतीराम लवंगे, खालीद कुरेशी,विक्रम देशमुख, अस्लम पठाण,सचिन जाधव, सुनिल कळसकर, मयुर राऊत, आबिद कुरेशी, भगवान गायकवाड,गजानन भोसले, रखमाजी राऊत यांच्यासह शेकडो काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
सत्ताधारी आमदार कमी पडल्याची शेतकऱ्यांमध्ये भावना : प्रकाश पाटील
काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, या मागणीसाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये सत्ताधारी आमदार यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. बुलढाणामध्ये आमदार संजय गायकवाड यांच्याकडे आम्ही जाणार होतो परंतु तेच आमच्यामध्ये जयस्तंभ चौकात आले. त्यांनी आमचे निवेदन स्वीकारले. या अगोदर जिल्हाधिकाऱ्यांनाही आम्ही निवेदन दिले होते. जिल्ह्यातील सत्ताधारी आमदार, खासदार हे कुठेतरी कमी पडले ही शेतकऱ्यांमध्ये भावना असल्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी सांगितले. येत्या आठ-दहा दिवसांमध्ये जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर झाला नाही तर पालकमंत्र्याला आम्ही आमच्या पद्धतीने घेराव घालू, असा इशाराही त्यांनी दिला


