dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

नेपाळमध्ये ‘जलप्रलय’! 17 मृत्यू ; तिबेट सीमेजवळ आलेल्या पुरामुळे ४०० लोक बेपत्ता

काठमांडू : तिबेटमधून अचानक आलेल्या पुरामुळे नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात प्रचंड विध्वंस झाला आहे. भोटेकोशी नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने तिमुरे आणि स्याब्रुबेसी भागातील अनेक घरांचे नुकसान झाले आहे. रसुवा येथील एक जलविद्युत प्रकल्पही पुराच्या तडाख्यात सापडून वाहून गेला आहे. आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

काठमांडू : तिबेटमधून अचानक आलेल्या पुरामुळे नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात प्रचंड विध्वंस झाला आहे. भोटेकोशी नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने तिमुरे आणि स्याब्रुबेसी भागातील अनेक घरांचे नुकसान झाले आहे. रसुवा येथील एक जलविद्युत प्रकल्पही पुराच्या तडाख्यात सापडून वाहून गेला आहे. आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पुरामुळे मोठ्या संख्येने लोक बेपत्ता आहेत. नेपाळच्या पर्यटन विभागाच्या माहितीनुसार, सुमारे 400 लोक बेपत्ता आहेत. यामध्ये १०५ भारतीय नागरिकांसह २९१ परदेशी पर्यटकांचा समावेश आहे.

बुधवारी सकाळी तिबेटला लागून असलेल्या नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात विनाशकारी अचानक आलेल्या पुरामुळे अनेक गावे उद्ध्वस्त झाली आणि मोठ्या प्रमाणातील पायाभूत सुविधांचे नुकसान झाले. पुरामुळे नदीकाठच्या भागात प्रचंड विध्वंस झाला आणि किमान डझनभर जलविद्युत प्रकल्पांचे नुकसान झाले. भोटे कोशी नदीला तिबेटच्या बाजूने सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास (स्थानिक वेळेनुसार) पूर आला. या अचानक आलेल्या पुराचा परिणाम रसुवा आणि धादिंग जिल्ह्यांवर, तसेच काठमांडूच्या नैऋत्येकडील नुवाकोट जिल्ह्यावर झाला. नेपाळ पर्यटन मंडळाने (एनटीबी) एक निवेदन जारी करून सांगितले की, रसुवामधील पुरामुळे एकूण ३८४ प्रवासी बेपत्ता आहेत, ज्यात २९१ परदेशी नागरिक आणि ९३ नेपाळी नागरिकांचा समावेश आहे. या बेपत्ता प्रवाशांमध्ये १०५ भारतीय, ३७ अनिवासी भारतीय (एनआरआय) आणि अमेरिका, मलेशिया, युके, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व नेदरलँड्समधील इतर पर्यटकांचा समावेश आहे. सम्राट टूर्स अँड ट्रॅव्हल एजन्सीने कळवले आहे की, बेपत्ता झालेल्या भारतीयांपैकी किमान ५९ जण कैलास मानसरोवर यात्रेकरू होते.

महापुरामुळे बिहारला ‘हाय अलर्ट’

नेपाळच्या वरच्या बाजुच्या डोंगराळ भागात आणि पाणलोट क्षेत्रात सततच्या मुसळधार पावसामुळे आलेल्या महाप्रलयाचा धोका भारताला आहे. या जलप्रलयामुळे बिहारवर पुन्हा एकदा पुराचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. नेपाळमधून मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्यामुळे गंडक नदीचा प्रवाह वेगाने वाढत आहे, त्यामुळे राज्य सरकार आणि प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. जाणकारांच्या अंदाजानुसार, नदीच्या पाणी पातळीतील या वेगाने होणाऱ्या वाढीमुळे ३ मीटर उंचीच्या लाटा येऊ शकतात. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, सर्व बाधित सीमावर्ती आणि मैदानी जिल्ह्यांमध्ये युद्धपातळीवर सुरक्षा व्यवस्था आणि तयारी सुरू करण्यात आली आहे.

एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथके तैनात

आपत्ती व्यवस्थापन दल कोणत्याही संभाव्य आपत्तीपासून लोकांचे संरक्षण करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) विशेष पथके गोपालगंज आणि बेतिया येथे पाठवण्यात आली आहेत, तर मुझफ्फरपूरमध्ये एक पथक सज्ज ठेवण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, बिहार राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची पथके देखील तैनात केली जात आहेत. सशस्त्र सीमा बलाच्या डीआयजींनी देखील आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत पुरवण्यासाठी त्यांच्या जलद प्रतिसाद पथकाला सतर्क केले आहे.

भारत नेपाळच्या पाठीशी : मोदी

नेपाळमध्ये आलेल्या आपत्तीच्या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. या आपत्तीत झालेल्या जीवितहानीबाबत शोक व्यक्त केला आहे. या संकटसमयी भारतीय जनता नेपाळमधील बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी नेपाळच्या पंतप्रधानांना दिले आहे. या कठीण काळात भारत नेपाळला सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. तसेच मदत आणि बचाव कार्यासाठी आमची पथके एकमेकांशी समन्वय साधत आहेत, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top