स्थानिकांच्या घरासमोर होत असलेल्या गंगापूर शहरातील आठवडी बाजार परिसरातील सुलभ शौचालयाच्या बांधकामास महाराष्ट्र नवनिर्माण सेना – रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना विभाग आणि स्थानिक रहिवाश्यांनी विरोध केला आहे. आठवडी बाजारात सुलभ शौचालयाचे बांधकाम करण्यात येऊ नये या मागणीचे निवेदन गंगापूर नगरपालिकेच्या मुख्यधिकाऱ्यांना देण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर : स्थानिकांच्या घरासमोर होत असलेल्या गंगापूर शहरातील आठवडी बाजार परिसरातील सुलभ शौचालयाच्या बांधकामास महाराष्ट्र नवनिर्माण सेना – रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना विभाग आणि स्थानिक रहिवाश्यांनी विरोध केला आहे. आठवडी बाजारात सुलभ शौचालयाचे बांधकाम करण्यात येऊ नये या मागणीचे निवेदन गंगापूर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले.
गंगापूर शहरात दर शनिवारी आठवडी बाजार भरविण्यात येतो. आठवडी बाजाराच्या दिवशी गंगापूर तालुक्यातील अनेक शेतकरी, नागरिक आठवडी बाजारात भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करण्यासाठी येतात. आठवडी बाजारात येणाऱ्या नागरिकांसाठी नगरपालिका प्रशासनाच्या वतीने आठवडी बाजार परिसरात सुलभ शौचालयाच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र हे शौचालय स्थानिकांच्या घरासमोर होत असल्याने नागरिकांनी त्यास विरोध दर्शवला आहे. जागा बदलून शौचालय बांधावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेने दिला आहे.
गंगापूर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना विभागाचे जिल्हा संघटक अशोक पवार पाटील, उपजिल्हा संघटक अशोक कराळे पाटील, तालुका सचिव बाळासाहेब बोजवारे पाटील, आठवडी बाजार परिसरातील स्थानिक रहिवासी समद शेख, शेख सिराज, कय्युम बागवान, शफीक शेख, जुबेर बागवान, सुलताना पठाण, शहेजादी बागवान, सुरैया शेख, शकीला शेख, अमजद मुनीरखान, रफिक इस्माईल शेख, हमीद दिलावर पठाण, मज्जमिल बागवान, परवीन फेरोज शेख, फेरोज शेख, कलीम शेख, नाजिम शहा रशीद शहा, शकीला अब्बास बागवान, शेख यासीन शेख अकबर, मंगल अनिल भेंडेकर , नजमाबी महेबूब, नाजिया अशपाक बागवान, तब्बसुम रफीक शेख, साहिल वसीम बागवान आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.