dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

‘डायल ११२’ च्या तत्परतेने वाचले 1.30 लाख; समृद्धीवर हरवलेली रक्कम दोन दिवसांत मिळाली

मालेगाव : डायल 112 पथकाच्या तत्परता आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे एका नागरिकाचे 1 लाख 30 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान टळले. समृद्धी महामार्गावरील पेट्रोल पंपावर विसरलेली रोख रक्कम असलेली बॅग शोधून दोन दिवसांत मूळ मालकाच्या ताब्यात देण्यात आली.

मालेगाव : डायल 112 पथकाच्या तत्परता आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे एका नागरिकाचे 1 लाख 30 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान टळले. समृद्धी महामार्गावरील पेट्रोल पंपावर विसरलेली रोख रक्कम असलेली बॅग शोधून दोन दिवसांत मूळ मालकाच्या ताब्यात देण्यात आली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 जून रोजी सायंकाळी 7 वाजता डायल 112 नियंत्रण कक्षाला कॉलरने समृद्धी महामार्गावरील पेट्रोल पंपावर रोख रक्कम असलेली बॅग विसरल्याची माहिती दिली होती.  या माहितीवरून पोलीस ठाणे मालेगाव येथील डायल 112 वाहनावरील सुखनंदन तांबारे यांनी पोलीस निरीक्षक राजेश खेरडे यांना माहिती देऊन मार्गदर्शन घेतले. त्यानंतर कॉलरशी संपर्क साधून सविस्तर माहिती घेतली असता, मनोज जगदीश मुजुमदार, (रा. नेवासा, जि. अहमदनगर) यांनी समृद्धी महामार्गावरील जवळका हद्दीतील पेट्रोल पंपावर 1 लाख 30 हजार रुपयांची बॅग विसरल्याचे सांगितले.  माहिती मिळताच  सुखनंदन तांबारे आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल पवन भालेराव यांनी समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक 231 जवळील पेट्रोल पंप गाठला. तेथे पाहणी केली असता संबंधित बॅग पेट्रोल पंपाच्या कार्यालयात सुरक्षित आढळून आली. पंचांसमक्ष बॅग उघडून पाहणी केली असता त्यात 1 लाख 30 हजार रुपयांची रोख रक्कम असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर कॉलरशी संपर्क साधून रक्कमेची खात्री करण्यात आली.   आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून 26 जून रोजी मालेगाव पोलीस ठाण्यात 1 लाख 30 हजार रुपयांची रोख रक्कम मूळ मालकाच्या ताब्यात देण्यात आली. डायल 112 पथक, पोलीस निरीक्षक राजेश खेरडे, पोहेकॉ सुखनंदन तांबारे आणि पोलीस कॉन्स्टेबल पवन भालेराव यांच्या तत्परतेमुळे मोठे आर्थिक नुकसान टळले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top