dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

मानोरा पोटनिवडणुकीत तस्लीम शहा यांची बाजी :  १६४ मते; वार्ड १४ वर विजयाचा झेंडा

मानोरा : नगर पंचायत वार्ड क्रमांक १४ साठी झालेल्या पोटनिवडणुकीत नगराध्यक्ष हेमेंद्र ठाकरे यांचे समर्थक तस्लीम शहा कय्युम शहा यांनी २७ मतांच्या फरकाने विजय मिळविला. निकाल जाहीर होताच समर्थकांनी जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला.

मानोरा : नगर पंचायत वार्ड क्रमांक १४ साठी झालेल्या पोटनिवडणुकीत नगराध्यक्ष हेमेंद्र ठाकरे यांचे समर्थक तस्लीम शहा कय्युम शहा यांनी २७ मतांच्या फरकाने विजय मिळविला. निकाल जाहीर होताच समर्थकांनी जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला.

वार्ड क्रमांक १४ मधील पोटनिवडणुकीसाठी २० जून रोजी मतदान पार पडले होते. एकूण ४२८ मतदारांपैकी ३३२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदानानंतर उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाल्याने निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. रविवारी सकाळी १० वाजता नगर पंचायत सभागृहात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतमोजणी प्रक्रिया पार पडली. मतमोजणीनंतर तस्लीम शहा यांना सर्वाधिक १६४ मते मिळाली. त्यांच्या प्रतिस्पर्धी हाफिज खान यांना १३७ मते, तर नुरेद खान यांना २८ मते मिळाली. तसेच तीन मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. निकाल जाहीर होताच निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र पाटील यांनी तस्लीम शहा कय्युम शहा यांना विजयी घोषित केले. त्यानंतर समर्थकांनी घोषणाबाजी करत विजयाचा जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी करून तसेच एकमेकांना मिठाई भरवून आनंद व्यक्त करण्यात आला. निवडणूक व मतमोजणी प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकपणे पार पडावी यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घेतली होती. तहसील प्रशासनाच्या देखरेखीखाली संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पडली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top