dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

शेगाव शहरात अवैध गुटख्याचा मोठा साठा जप्त; वाहनासह 70 लाखांहून अधिक मुद्देमाल ताब्यात

शेगाव :  शेगाव शहर पोलीस ठाणे हद्दीत अवैध पानमसाला व तंबाखू वाहतूक प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेगाव :  शेगाव शहर पोलीस ठाणे हद्दीत अवैध पानमसाला व तंबाखू वाहतूक प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील फिर्यादी अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 13 जून रोजी रात्री 10.10 वाजताच्या सुमारास यादव बेकरीसमोर वरवट बकाल रोड परिसरात ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान संशयित वाहनाची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात पानमसाला व तंबाखूचा साठा आढळून आला. या कारवाईत मालवाहू वाहन क्रमांक एमएच -40-जीटी-2965 चा चालक सुरुर अहमद नूर अहमद रा. अकोला तसेच संबंधित उत्पादन कंपनीचे मालक, संचालक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये शासनाने बंदी घातलेला विविध प्रकारचा पानमसाला व तंबाखूचे पाकिटे यांचा समावेश असून त्याची एकूण किंमत सुमारे 50 लाखांपेक्षा अधिक आहे. तसेच वापरात असलेले मालवाहू वाहन अंदाजे किंमत 20 लाख रुपये ताब्यात घेण्यात आले आहे. एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे 70 लाख 13 हजार 920 रुपये इतकी आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलीस पथकाने संयुक्तरित्या केली. या प्रकरणी विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुणाल जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top