dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

भाविकांसाठी आनंदवार्ता; तिरुपतीसाठी नवी रेल्वे सुविधा; ओखा-तिरुपती साप्ताहिक एक्सप्रेस ११ मेपासून धावणार 

वाशिम : पश्चिम रेल्वेद्वारे ओखा ते तिरुपती दरम्यान सुरू करण्यात आलेली नवीन साप्ताहिक एक्सप्रेस ११ मेपासून नियमित धावणार असून अकोल-वाशिम मार्गे तिरुपतीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे. विशेष म्हणजे, अकोला आणि  वाशिमकरांसाठी तिरुपतीकडे जाणारी ही तिसरी नियमित रेल्वे सेवा असणार आहे.

वाशिम : पश्चिम रेल्वेद्वारे ओखा ते तिरुपती दरम्यान सुरू करण्यात आलेली नवीन साप्ताहिक एक्सप्रेस ११ मेपासून नियमित धावणार असून अकोल-वाशिम मार्गे तिरुपतीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे. विशेष म्हणजे, अकोला आणि  वाशिमकरांसाठी तिरुपतीकडे जाणारी ही तिसरी नियमित रेल्वे सेवा असणार आहे.

या नवीन रेल्वे सेवेचा शुभारंभ ११ मे रोजी ओखा स्थानकावर खासदार पूनमबेन माडम आणि आमदार पभुभा माणेक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी रेल्वे क्रमांक १९५६०/१९५५९ ओखा-तिरुपती साप्ताहिक एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. रेल्वे क्रमांक १९५६० ओखा-तिरुपती एक्सप्रेस दर सोमवारी रात्री ११.३५ वाजता ओखा येथून सुटून बुधवारी रात्री ११.३० वाजता तिरुपती येथे पोहोचेल. तर रेल्वे क्रमांक १९५५९ तिरुपती-ओखा एक्सप्रेस दर गुरुवारी सकाळी ८.१५ वाजता तिरुपती येथून सुटून शनिवारी सकाळी ११.५० वाजता ओखा येथे पोहोचणार आहे. ही रेल्वे द्वारका, जामनगर, राजकोट, अहमदाबाद, वडोदरा, सुरत, नंदुरबार, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशिम, हिंगोली डेक्कन, वसमत, पूर्णा, नांदेड, निजामाबाद, काचीगुडा, कर्नूल सिटी, कडप्पा आणि रेनिगुंटा आदी प्रमुख स्थानकांवर थांबा घेणार आहे. या रेल्वेमुळे पश्चिम आणि दक्षिण भारताला थेट जोडणी मिळणार असून व्यापार व प्रवासी वाहतुकीलाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, ३ मेपासून अकोला-तिरुपती एक्सप्रेस कायम  करण्यात आली असून तसेच अमरावती-तिरुपती द्विसाप्ताहिक रेल्वे सेवा सुरू आहे. आता ओखा-तिरुपती साप्ताहिक एक्सप्रेसमुळे तिरुपती प्रवासासाठी आणखी एक सोयीस्कर पर्याय उपलब्ध झाला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top