dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

रिधोरा नजीक भीषण कार अपघात; कंत्राटदाराचा जागीच मृत्यू

मेडशी : अकोला-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर रिधोरा गावाजवळ झालेल्या भीषण कार अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना ८ मे रोजी रात्री सुमारे ९ वाजताच्या दरम्यान हॉटेल मामा भांजे समोर घडली.

मेडशी : अकोला-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर रिधोरा गावाजवळ झालेल्या भीषण कार अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना ८ मे रोजी रात्री सुमारे ९ वाजताच्या दरम्यान हॉटेल मामा भांजे समोर घडली.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-३७ जी ६९३९ क्रमांकाची कार अकोल्याकडून मालेगावकडे येत होती. दरम्यान, रिधोरा गावाजवळील हॉटेल मामा भांजे समोर ही कार पलटी झालेल्या अवस्थेत आढळून आली. अपघातात कारमधील अक्षय विजयराव घुगे (वय ३४, मूळ रा. कुरळा, सध्या मालेगाव) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांचा मित्र संदेश संजय लाहोटी (वय ३२, रा. मालेगाव) हा गंभीर जखमी झाला आहे.

मृत अक्षय घुगे व जखमी संदेश लाहोटी हे दोघेही मालेगाव तालुक्यातील प्रसिद्ध शासकीय कंत्राटदार असल्याची माहिती आहे. कामानिमित्त ते अकोला येथे गेले होते. अकोल्यावरून मालेगावकडे परत येत असताना हा दुर्दैवी अपघात घडला.

अपघात इतका भीषण होता की कारच्या पुढील भागाचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला. भरधाव कार समोरील वाहनावर आदळल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज घटनास्थळी उपस्थित नागरिक व पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगळे व हेड कॉन्स्टेबल मनीष राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी व मृत व्यक्तीला तातडीने रुग्णालयात हलविले. तसेच अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

अक्षय घुगे यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ व पत्नी असा मोठा परिवार असून, त्यांच्या अकाली निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top