dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

बारामतीत सुनेत्रा पवारांचा ऐतिहासिक विजय; देशातील सर्वात मोठ्या मताधिक्याचा विक्रम 

पुणे :बारामती आणि राहुरी या दोन महत्त्वाच्या मतदारसंघांतील पोटनिवडणुकांचे निकाल 4 मे रोजी जाहीर झाले आहेत. बारामतीमध्ये दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मैदानात उतरल्या होत्या. सुनेत्रा पवार २ लाख १८ हजार ९३० मतांनी विजयी झाल्या आहेत. यासोबतच सुनेत्रा पवार यांनी देशाच्या इतिहासातील नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

राहुरी मतदारसंघातही एकतर्फी लढत पाहायला मिळाली. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली आहे. अक्षय कर्डिले यांनी १ लाख ३९ हजार २१२ मते मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांचा पराभव केला आहे. बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अभूतपूर्व कामगिरी करत मोठा विजय मिळवला आहे. मतमोजणीच्या 24 व्या फेरीअखेर त्यांनी तब्बल 2 लाख 18 हजार 930 मतांची आघाडी घेतली, जी देशातील सर्वाधिक मताधिक्यांपैकी एक मानली जात आहे. प्रत्येक फेरीत त्यांची आघाडी वाढत गेल्याने प्रतिस्पर्ध्यांना मोठा धक्का बसला. या विजयामुळे उत्तर प्रदेशातील साहिबाबाद मतदारसंघातील आमदार सुनील कुमार शर्मा यांनी 2022 मध्ये केलेला 2 लाख 14 हजार 835 मताधिक्याचा विक्रम मागे पडल्याचा दावा केला जात आहे. बारामतीतील निकालाने हा आकडा ओलांडत नवा विक्रम प्रस्थापित केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top