dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

माझ्या बुलढाण्यातील ‘हा’ लोकप्रतिनिधी विकृत! महाराष्ट्राची माफी मागतो;  हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले? 

बुलढाणा :  ‘माझ्या बुलढाण्यातील लोकप्रतिनिधी इतका अज्ञानी असेल, मूर्ख आणि विकृत असेल तर मला शरम वाटते!, सर्वात आधी मी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागतो,’ अशा शब्दांत महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. 

 कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून आक्षेप घेत बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशकाला  शिवीगाळ  केल्याचा ऑडिओ महाराष्ट्रात सर्वदूर पसरला आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या विरुद्ध ठिकठिकाणी संतापाची लाट उसळली असून, एका पुस्तक प्रकाशकाला इतक्या खालच्या पातळीवर शिवीगाळ करणे, या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदविण्यात येत आहे. दरम्यान याच विषयाला अनुसरून मुंबई येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि मूळचे बुलढाण्याचे असलेले हर्षवर्धन सपकाळ हे एका मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देत होते. ”मी बुलढाण्याचा आहे, माझ्या बुलढाण्यातील लोकप्रतिनिधी!” हा अज्ञानी असेल तर याची मला शरम वाटते, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. आमदार संजय गायकवाड यांच्या व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंग नंतर संपूर्ण माध्यम क्षेत्रात कालपासून गायकवाड हे केंद्रबिंदू ठरलेले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top