एकबुर्जी धरणातून अनधिकृत पाणी उपसा; उच्च क्षमतेचा पंप जप्त

वाशिम :  शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर एकबुर्जी धरणातून अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने धडक कारवाई करत उच्च क्षमतेचा विद्युत पंप जप्त केला. महसूल विभाग, पाटबंधारे विभाग, नगरपरिषद व पोलिस यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शेतकऱ्याने अधिकृत मंजुरी मिळालेली नसतानाही शेतात उच्च क्षमतेचा विद्युत पंप बसवून थेट धरणातून पाणी उपसा सुरू ठेवला होता. प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. दरम्यान, प्रत्यक्ष पाहणीदरम्यान पंपाद्वारे पाणी उपसा सुरू असल्याचे आढळून आल्यानंतर पंचनामा करून तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सदर पंप जप्त करण्यात आला. शहरातील वाढती लोकसंख्या व पाण्याची मागणी लक्षात घेता धरणातील पाणी साठा राखणे आवश्यक असल्याने ही कारवाई करण्यात आली. अनधिकृत पाणी उपसा व वीज वापरामुळे इतर नागरिकांवर अन्याय होत असल्याने अशा प्रकारांवर पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »