शेगाव : शहरातील व्यंकटेश नगर परिसरातील एका ताडाच्या उंच झाडावर वीज कोसळल्याचा थरारक प्रकार मोबाईल मध्ये कैद झाला आहे. काही क्षणातच उभे असलेले हिरवेगार ताडाचे झाड जळून खाक होतानाचे चित्र प्रचंड प्रमाणात वायरल होताना दिसून येत आहे.

शेगाव, खामगाव, मलकापूर,नांदुरा, जळगाव जामोद मध्ये जोरदार पाऊस
शेगाव : शहरातील व्यंकटेश नगर परिसरातील एका ताडाच्या उंच झाडावर वीज कोसळल्याचा थरारक प्रकार मोबाईल मध्ये कैद झाला आहे. काही क्षणातच उभे असलेले हिरवेगार ताडाचे झाड जळून खाक होतानाचे चित्र प्रचंड प्रमाणात वायरल होताना दिसून येत आहे. 18 मार्च पासून ते 20 मार्च पर्यंत विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली होती. 18 मार्च रोजी रात्री विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. विदर्भाचे प्रवेशद्वार असलेले मलकापूर तसेच नांदुरा जळगाव जामोद शेगाव आणि खामगाव शहरामध्ये सुद्धा रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दरम्यान शेगाव शहरातील व्यंकटेश नगर भागातील एका उंच ताडाच्या झाडावर अचानक वीज कोसळली बघता बघता हिरवेगार उंच झाड काही क्षणात जळून खाक झाले. हे दृश्य शेगावकरांनी त्यांच्या मोबाईल मध्ये टिपले असून मोठ्या प्रमाणात वायरल सुद्धा होत आहे.
