वाशिम हादरले; मुरुमातून बाहेर आला मृतदेहाचा पाय; हत्या की अपघात? पोलिसांचा तपास वेगात

वाशिम :  वाशिम-हिंगोली महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामादरम्यान मंगळवारी रात्री एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. रस्त्याच्या कामासाठी टाकण्यात आलेल्या मुरुमाच्या ढिगाऱ्यात मानवी शरीराचे अवयव आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना १७ मार्च रोजी रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास बाजार समिती ते डम्पिंग ग्राऊंड दरम्यान घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गाच्या कामासाठी कंत्राटदाराने बोराळा परिसरातून मुरुम आणला होता. मंगळवारी रात्री मुरुमाची मोजणी व पसरवण्याचे काम सुरू असताना कामगारांना एका ढिगाऱ्यात मानवी पायाचा भाग दिसून आला. हा प्रकार लक्षात येताच कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली.

घटनेची माहिती मिळताच वाशिम शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ पथकासह घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात आढळलेले अवयव हे एका पुरुष व्यक्तीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, अज्ञात व्यक्तीची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो मुरुमात गाडण्यात आला असावा, असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. तसेच, बोराळा येथील उत्खननातून हे अवशेष मुरुमासोबत आले असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून, मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले असून मुरुमाचे ढिगारे हटवून शरीराचे इतर अवयव शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »