dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

ट्रॅक्टर चोरी प्रकरणाचा उलगडा; ९ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघे अटकेत

वाशिम : जिल्ह्यातील धानोरा मापारी परिसरात घडलेल्या ट्रॅक्टर चोरी प्रकरणाचा अनसिंग पोलिसांनी उलगडा करत तिघा आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत सुमारे ९ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे विविध पोलीस ठाण्यांमध्ये नोंद असलेल्या चोरीच्या गुन्ह्यांचाही उलगडा झाला आहे.

पोलीस ठाणे अनसिंग येथे गुन्हा क्रमांक ७८/२०२६ अन्वये कलम ३०३(२), ३(५) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तपासादरम्यान रिसोड पोलीस ठाणे (गु.क्र. ५६४/२०२४), वाशिम ग्रामीण पोलीस ठाणे (गु.क्र. २३०/२०२४) तसेच बार्शीटाकळी, जि. अकोला पोलीस ठाण्यातील (गु.क्र. १८०/२०२६) चोरीच्या गुन्ह्यांशीही या आरोपींचा संबंध असल्याचे समोर आले.

पोलिसांनी केलेल्या तपासात वैभव विष्णू नानोटे (वय २८), बाळकृष्ण लबाडे (वय ५०, दोघेही रा. दुबळवेल) तसेच आकाश कांबळे (रा. गुंज, ता. मालेगाव, जि. वाशिम) या तिघांना अटक करण्यात आली.

आरोपींकडून महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर (किंमत ४ लाख ७५ हजार), चोरीसाठी वापरलेला महिंद्रा जीतो मालवाहू पिकअप (किंमत ३ लाख ५० हजार), दोन पाण्याचे मोटर पंप (किंमत ३० हजार) आणि आयशर कंपनीचा जनरेटर (किंमत ५० हजार) असा एकूण ९ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक मास्कर आणि रेघीवाले यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक सोनवणे, राहुल व्यवहारे, अविनाश वाढे, भूषण ठाकरे, तुषार ठाकरे, शुभम चौधरी, राजकुमार यादव, सुनील तायडे व संदीप डाखोरे यांच्या पथकाने केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top