dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

बे-वारस दुचाकी वाहनांची ओळख पटविण्याचे आवाहन

परभणी :  शहरातील कोतवाली पोलिस ठाण्याच्या आवारात गेल्या अनेक वर्षापासून 18 दुचाकी वाहने बे-वारस आवस्थेत पडून असून या वाहनांची ओळख पटवून संबंधित वाहन मालकाने आपले वाहन ताब्यात घ्यावे असे आवाहन कोतवाली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक व्ही.जी. कासले यांनी केले आहे.

कोतवाली पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारवाईत जप्त करण्यात आलेली, तसेच बे-वारस आवस्थेत मिळून आलेली जवळपास 15 मोटारसायकल आणि 3 मोपेड दुचाकी वाहने गेल्या अनेक वर्षापासून कोतवाली पोलिस ठाण्याच्या आवारात पडून आहेत. पोलिस ठाण्याच्या आवारात बे-वारस आवस्थेत पडून असलेल्या वाहनांचे क्रमांक, इंजिन क्रमांक, चेसीस क्रमांक पोलिसांनी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित केले आहेत. वाहन मालकांनी आपल्या वाहनाची ओळख पटविण्यासाठी वाहनाची कागदपत्रे शुक्रवार, 13 मार्च रोजी पर्यंत कोतवाली पोलिस ठाण्यात सादर करुन ती वाहने ताब्यात घ्यावीत असे आवाहन सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक व्ही.जी. कासले यांनी केले आहे. शुक्रवार पर्यंत कोणीही वाहन घेण्यासाठी समोर न आल्यास न्यायालयाच्या आदेशानुसार त्या वाहनांची विल्हेवाट लावण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top