dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

देवगिरी किल्ला आगीने होरपळला

छत्रपती संभाजीनगर :  दौलताबाद येथील देवगिरी किल्ला परिसरात असलेल्या गवताला माथेफिरुने लावलेल्या आगीमुळे सलग दुसऱ्या वर्षी देवगिरी किला आगीत होरपळून निघाला. ही घटना बुधवार, 11 मार्च रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. देवगिरी किल्ल्याला लागलेल्या आगीमुळे किल्ल्यावर वास्तव्य असलेले अनेक लहान पशु-पक्ष्यांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला.

दौलताबाद परिसरात देवगिरी किल्ला असून बुधवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास माथेफिरुने किल्ल्यावर असलेल्या वाळलेल्या गवताला आग लावली. पाहता, पाहता आगीने रौद्ररुप धारण केले होते. या घटनेची माहिती मिळाल्यावर अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर, उपमुख्य अग्निशमन अधिकारी विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली डयुटी अधिकारी कोल्हे, वसीम पठाण, सूरज राठोड, अग्निशामक जवान रितेश कसूरे, छगन सलामबाद, इरफान पठान, दुधे, बावस्कर, सपकाळ, गाडेकर, सपकाळ, रामदास राउत, विसपुते, बचाते आदींनी अग्निशमन दलाच्या तीन बंबाच्या मदतीने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top