भारत विश्वविजेता!  टी-20 वर्ल्ड  कपमध्ये टीम इंडिया तिसऱ्यांदा रचला इतिहास : न्यूझीलंडचा 96 धावांनी  पराभव 

अहमदाबाद :  येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर  रविवारी भारतीय क्रिकेटने नवा इतिहास रचला. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करत विश्वचषकावर आपले नाव कोरले.

अहमदाबाद :  येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर  रविवारी भारतीय क्रिकेटने नवा इतिहास रचला. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करत विश्वचषकावर आपले नाव कोरले.

विशेष म्हणजे, टीम इंडियाने सलग टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा पहिला संघ बनण्याचा मान मिळवला आहे. न्यूझीलंडसमोर 256 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर भारतीय गोलंदाजांनीही कमाल दाखवत किवी संघाचा पराभव केला. 

जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांच्या घातक माऱ्यासमोर न्यूझीलंडचा डाव 159 धावांवरच आटोपला आणि भारताने 96 धावांनी दणदणीत विजय मिळवत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक पटकावले. हा केवळ विजय नव्हता, तर भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा अभिमानाचा क्षण होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »