dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

चिखला घटनेविरोधात संताप; केशवनगरात रास्तारोको; आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी 

रिसोड : तालुक्यातील केशवनगर  येथे चिखला (ता.लोणार) येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासंदर्भातील वादाच्या पार्श्वभूमीवर २३ फेब्रुवारी  रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रिसोड–मालेगाव रोडवरील केशवनगर परिसरात सकाळपासून आंदोलनकर्त्यांनी रस्ता अडवून जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. तसेच एका महिलेस अमानुष मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली.

या आंदोलनामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागला. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला नेण्यात आले असून, थोड्याच वेळात त्यांची सुटका करण्यात आली.  दरम्यान, स्मारकाच्या वादाबाबत संतप्त नागरिकांनी शिरपूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार वाघ यांना निवेदन देत योग्य कारवाईची मागणी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत कोणताही अपमान किंवा अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती शांत झाली. स्मारकाच्या प्रश्नावर पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top