dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

चोरट्यांनी मंदिराची दानपेटी फोडली, 5 हजार रुपये लंपास; टेंभुर्णी शहरातील घटना

टेंभुर्णी :  शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरात असलेल्या हनुमान मंदिराची दानपेटी फोडून चोरट्यांनी पेटीतील 5 हजार रुपये चोरुन नेले. चोरीची ही घटना मंगळवार, 3 फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी चोरट्याविरुध्द टेंभुर्णी पोलिस ठाण्यात हनुमान भक्तंनी तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

टेंभुर्णी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरात असलेल्या हनुमान मंदिरात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरटे शिरले. चोरट्यांनी मंदिराच्या दानपेटीचा कडी-कोयंडा लोखंडी टॉमीच्या सहाय्याने तोडला. चोरट्यांनी दानपेटीतील जवळपास 5 हजार रुपये चोरले. तसेच दानपेटीत 111 रुपये ठेवून पसार झाले. मंगळवारी पहाटेच्या सुमारास हनुमान भक्त सांडू राऊत हे मंदिरात दर्शनासाठी गेले असता मंदिरात चोरी झाल्याचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. सांडू राऊत यांनी हा प्रकार इतर हनुमान भक्तांच्या निदर्शनास आणून दिला. या घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मध्यवस्तीत असलेल्या हनुमान मंदिराची दानपेटी चोरट्यांनी लक्ष केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, मंदिरात चोरी करणाऱ्या चोरट्याविरुध्द कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सांडू राऊत यांनी टेंभुर्णी पोलिसांकडे केली आहे. तसेच याप्रकरणी चोरट्यांविरुध्द टेंभुर्णी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top