बाळापूर-वाडेगाव मार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

अकोला: बाळापूर ते वाडेगाव मार्गावर अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवार २ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. ही मादी बिबट असून तिचे वय साधारण दोन ते अडीच वर्षे असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. 

बाळापूर-वाडेगाव रस्त्यावर एक बिबट अपघातात ठार झाल्याची घटना उघडकीस आली. रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना रस्त्याच्या कडेला बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. अकोला वनविभागाला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने सूत्रे हलवली. उपवनसंरक्षक सुमंत सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक पवन जाधव व आर.एफ.ओ. विश्वास थोरात यांच्या आदेशानुसार वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले.

या पथकात वनपाल गजानन गायकवाड, मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे, वनरक्षक एन.एन. सावळे, राम काकडे, यशपाल इंगोले आणि तुषार अवारे यांचा समावेश होता. वनविभागाने पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आले होते. त्याअनुषंगाने अकोला वनविभागाने प्रसारमाध्यमांद्वारे आणि प्रत्यक्ष गावागावांत जाऊन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले होते. मात्र, रस्ते ओलांडताना वन्यजीवांना वेगाचा अंदाज येत नसल्याने असे अपघात घडत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »